Video: मकर संक्रांतीच्या मेळ्यात चेंगराचेंगरी, 1 महिलेचा मृत्यू, 9 गंभीर जखमी

WhatsApp Group

ओडिसामध्ये मकर संक्रांतीच्या मेळ्यात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे प्रकरण कटक जिल्ह्यातील बडंबा-गोपीनाथपूर टी ब्रिजशी संबंधित आहे. हा टी ब्रिज दोन्ही बाजूंनी सिंहनाथ मंदिराला जोडतो. येथे दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी मेळावा भरतो. आजही सुमारे दोन लाख भाविक येथे जमले होते. चेंगराचेंगरीच्या वेळी काही लोकांनी घाबरून पुलावरून उड्या मारल्या.

या प्रकरणात, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दुसरीकडे, अथगढचे उपजिल्हाधिकारी हेमंत कुमार स्वेन यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी सुमारे 2 लाख लोक मेळ्याला उपस्थित राहण्यासाठी जमले होते. यामध्ये लहान मुले व महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. जत्रेसोबतच ते भगवान सिंहनाथाची पूजा करण्यासाठी येथे जमले होते.

जत्रेत जखमी झालेल्यांना तात्काळ बडंबा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात (CHC) दाखल करण्यात आले. नंतर काही लोकांना कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे. घटनास्थळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 3 प्लाटून तैनात करण्यात आले आहेत. महानदीच्या काठावरील मंदिराजवळ दरवर्षी मकर मेळा भरवला जातो. जत्रेदरम्यान कटक, खोरधा, पुरी, अंगुल, ढेंकनाल, बौध आणि नयागड जिल्ह्यांमधून शेकडो भाविक मंदिरात येतात.