ओडिशात मोठा रेल्वे अपघात, कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली, 50 प्रवासी ठार, 350 जखमी

WhatsApp Group

ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईहून हावडाकडे जाणारी ही ट्रेन रुळावरून घसरली. या अपघातात 50 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 179 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बालासोरमधील बहनगाजवळ रेल्वे रुळावरुन घसरली.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी उपस्थित आहे. 600-700 बचाव दलाचे जवान काम करत आहेत. रात्रभर बचावकार्य राबविण्यात येणार आहे. सर्व रुग्णालये सहकार्य करत आहेत. आमची तात्काळ काळजी पीडितांना वाचवणे आहे. मालगाडी आणि दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या धडकेने हा अपघात झाल्याचे प्रदीप जेना यांनी सांगितले.

या अपघातातील मृतांना रेल्वेने भरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे. किरकोळ जखमींना 50-50 हजार रुपये दिले जातील. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव बालासोरला रवाना झाले आहेत. या अपघातामुळे गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवारी होणार होता.