बांकुरा येथे मोठा रेल्वे अपघात, 2 मालगाड्यांची टक्कर, 6 डबे रुळावरून घसरले

0
WhatsApp Group

पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे रेल्वे अपघात झाला. बांकुरा येथील ओंडा येथे लूप लाइनवर दोन मालगाड्यांची धडक झाली. दोन मालवाहू गाड्यांच्या एका इंजिनसह सहा डबे रुळावरून घसरले. एक चालक जखमी झाला, तर प्लॅटफॉर्म आणि सिग्नल रूमचे नुकसान झाले. रविवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे आद्रा-खड़गपूर शाखेवरील गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली.

बांकुराहून येणाऱ्या मालगाडीला धडक बसली

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांकुराहून येणारी दुसरी मालगाडी ओंडा स्थानकाजवळील लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीच्या मागील बाजूस धडकली. दोन मालवाहू गाड्यांच्या एका इंजिनसह सहा डबे रुळावरून घसरले. स्थानिक लोकांनी चालकांची सुटका केली. एकाच मार्गावर दोन मालवाहू गाड्या आल्याच कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडी बांकुराहून बिष्णुपूरला जात होती. रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीच्या मागील डब्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की मालगाडीच्या वॅगन्स रुळावरून अलग झाल्या आणि एकमेकांवर चढल्या. अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी हजर आहे. त्याचबरोबर मालगाडीचे डबे पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या डब्यांचे अधिक नुकसान झाले आहे, ते काढून अन्य ठिकाणी ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.