MPSC च्या मुख्य परीक्षेत मोठे बदल, अभ्यासक्रमातही होणार बदल

WhatsApp Group

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ने परीक्षापद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय मोठा घेतला आहे. नव्या पद्धतीनुसार मुख्य परीक्षा ही वर्णात्मक म्हणजेच लेखी स्वरूपाची असणार आहे. 2023 साली होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून हे बदल लागू करण्यात येतील. लोकसेवा आयोगाने पत्रक काढून याची माहिती जाहीर केली आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक 2 (CSAT) अर्हताकारी करण्याचा निर्णय आयोगानं मागील महिन्यांत घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 21 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून करण्यात येणार आहे.

पूर्वसेवा परीक्षेतील पेपर क्रमांक 2 म्हणजेच सीसॅट हा विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्यावर विचार करण्यासाठी माजी माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांची समिती आयोगाने नियुक्त केली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सी-सॅट विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाकडून यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे.