
पुणे – व्यावसायिक अविनाश भोसलेंवर (Avinash Bhosale) CBI ने छापेमारी केलेली होती. येस बॅंक आणि DHFLघोटाळयाप्रकरणी भोसलेंच्या मुंबई आणि पुणे येथील घरावर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आलेले होते. आज प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet kadam) यांचे सासरे अविनाश भोसले यांना सीबीआयकडून (CBI) अटक करण्यात आली आहे. डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी पुण्यामधून ही अटक करण्यात आली आहे.
Pune-based builder, Avinash Bhosale, will be produced before the court tomorrow. CBI raided Bhosale’s residence & office last month & ED also interrogated him last year.
Earlier, CBI arrested builder Sanjay Chabaria in the DHFL-Yes Bank case.
— ANI (@ANI) May 26, 2022
अविनाश भोसले हे एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक आहेत. अविनाश भोसले हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असलेले एक व्यक्ती आहेत. ते महाराष्ट्रातील मंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील अविनाश भोसले यांच्या कार्यालयामध्ये आणि निवासस्थानी तसेच मुंबईतील काही ठिकाणी छापा टाकला होता. अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित या दोघांचीही चौकशी करण्यात आली होती.