कुलगाममध्ये लष्कराची मोठी कारवाई, पाच दहशतवादी ठार

WhatsApp Group

जम्मू-काश्मीर – कुलगाममध्ये मोठी कारवाई करत भारतीय लष्कराने पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कुलगाममधील पोंबे येथे तीन तर गोपालपुरा येथे दोन दहशतवादी मारले गेले आहेत.

लष्कराची मोठी कारवाई, पाच दहशतवादी ठार
मिळालेल्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, सुरक्षा दलांनी गुप्त माहितीच्या आधारे ऑपरेशन केले आणि त्यानंतर कुलगामच्या पोंबे भागात तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सैन्याने या भागाला चारही बाजूंनी वेढा घातला होता आणि दहशतवाद्यांमा पळून जाण्याची एकही संधी दिली नाही. सुरक्षा दलांनीही संपूर्ण परिसरातील हालचालींवर बंदी घातली असून वाहतुकीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

याशिवाय कुलगामच्या गोपालपुरा भागातही दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. तसेच दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. अशा स्थितीत लष्कर दोन ठिकाणी एकाच वेळी लढा देत आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या नावांमध्ये टॉप कमांडर अफाक सिकंदर, शाकीर, हैदर आणि इब्राहिम यांचा समावेश आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत आहे. अलीकडेच, श्रीनगरच्या हैदरपोरा भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली होती. या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. याशिवाय दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आणखी दोघांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

काश्मीरबाबत उच्चस्तरीय बैठक
आता लष्कराच्या कारवाईदरम्यान सरकारही आपल्या स्तरावर बैठका घेत आहे. आज पुन्हा सरकारची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत गृह सचिव, जम्मू-काश्मीरचे डीजीपी, एनआयए/सीआरपीएफचे डीजी, बीएसएफ बीके डीजी यांच्यासह आयबी आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी सहभागी झाले होते.