
टांझानियामध्ये रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात प्रिसिजन एअरचे प्रवासी विमान कोसळले आहे. टांझानिया ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (टीबीसी) रविवारी सांगितले की, बुकोबा येथील विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात विमान व्हिक्टोरिया तलावात कोसळले. अपघाताची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही.
टीबीसीने सांगितले की, आतापर्यंत 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे, परंतु विमानात किती लोक मारले गेले आणि किती लोक होते याबद्दल अद्याप काहीही माहिती नाही. TBC ने वृत्त दिले की विमान राजधानी दार एस सलाम येथून उड्डाण केले आणि वादळ आणि मुसळधार पावसामुळे आज सकाळी लँडिंग करताना व्हिक्टोरिया तलावात कोसळले.
Commercial plane crashes in Tanzania’s Lake Victoria, rescue operations underway
Read @ANI Story |https://t.co/yBfOq8KLOt#PlaneCrash #Tanzania #LakeVictoria pic.twitter.com/vdcyxRGeyd
— ANI Digital (@ani_digital) November 6, 2022
अपघातानंतर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. विमानात अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. प्रिसिजन एअर ही टांझानियामधील खाजगी मालकीची सर्वात मोठी विमान कंपनी आहे.