गुजरातच्या कच्छमध्ये नर्मदा कालव्यात मोठी दुर्घटना, 15 वर्षीय मुलीसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू

WhatsApp Group

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील नर्मदा कालव्यात सोमवारी दोन जोडपे आणि एका किशोरवयीन मुलासह पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. प्रागपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंडाळा गावाजवळ सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन महिला, एक 15 वर्षीय मुलगी आणि दोन पुरुषांचे मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आले, असे स्थानिक प्रागपार पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

या घटनेची माहिती देताना कच्छ पश्चिम एसपी सौरभ सिंह यांनी सांगितले की, मुंद्राच्या गुंडाळा गावात नर्मदा कालव्यात एकाच कुटुंबातील पाच जण बुडाले. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. कालव्यातून पाणी आणत असताना घसरलेल्या महिलेला वाचवण्यासाठी इतर कुटुंबीयांनीही कालव्यात उडी घेतली. मात्र महिलेला वाचवण्याऐवजी इतरांचाही बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.