
तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यात बुधवारी मोठी दुर्घटना घडली आहे. येथे मंदिर उत्सवादरम्यान विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मिरवणुकीदरम्यान वरून जाणाऱ्या विजेच्या तारेला रथाचा स्पर्श झाला. यामुळे, संपूर्ण रथात करंट पसरले आणि त्याला आग लागली.
रथ यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भावीक जमले होते. रथ यात्रा सुरू असताना रथाचा स्पर्श वरून जाणाऱ्या विजेच्या तारांना झाला. या दुर्घटनेमध्ये अनेक लोक जखमी झाल्याचे आणि होरपळल्याचे वृत्त आहे. यानंतर उच्च अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले.
#WATCH | At least 10 people died after a temple car (of chariot festival) came in contact with a live wire in the Thanjavur district in Tamil Nadu pic.twitter.com/F4EdBYb1gV
— ANI (@ANI) April 27, 2022
यासंदर्भात बोलताना संबंधित भागाचे आयजी व्ही बालकृष्णन म्हणाले की, या घटनेमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. मिरवणुकीदरम्यान रथ विजेच्या तारांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे ही दुर्घटना घडली.