भोरच्या वरंधा घाटात सकाळी भीषण अपघात घडला आहे. येथे मिनी बस 60 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. वरवंड ते शिरगाव दरम्यान शिरगाव परिसरात भोर महाड रोडवरील वरंधा घाटात ही घटना घडली.
समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दोनच्या दरम्यान हा अपघात घडला. बस रस्ता सोडून धरणाच्या काठावरील 50 ते 60 फूट खोल खड्ड्यात कोसळली. रस्त्याची माहिती नसल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांसांगितले जात आहे.
या अपघातात चालक अजिंक्य कोलते जखमी झाले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कारमध्ये चालकासह 10-11 जण होते. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात दाखल करण्यात आले आहे.