कल्याण स्टेशनवर मोठा अपघात; एकाचा मृत्यू

WhatsApp Group

कल्याण रेल्वे स्थानकावर एक भीषण दुर्घटना घडली आहे.  पुण्यावरुन मुंबईकडे येणाऱ्या डेक्कन क्वीनएक्स्प्रेसमधून उतरताना, दोनजण खाली कोसळले. यात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृत आणि जखमी दोघेही भाऊ भाऊ आहेत. शुक्रवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान कल्याण स्टेशनवर ही घटना घडली.

सुरुवातील एक्स्प्रेस पकडताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत होतं. मात्र एक्स्प्रेसमध्ये चढताना नाही तर उतरताना हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

या दुर्घटनेनंतर स्टेशनवरील हमालांनी जखमीला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकारानंतर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला होता.