ख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म पेंडिंग का दिसतोय? कारण तुमचा फॉर्म पूर्णपणे भरलेला आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काही करायचं नाही, आता ते सरकारचं काम आहे. फॉर्म पेंडिंग का दाखवतो? तर सरकारी अधिकारी तो जो फॉर्म तुम्ही भरलेला आहे, तो फॉर्म चेक करतील. त्यामध्ये कागदपत्र तुमची माहिती हा फॉर्म संपूर्ण चेक झाल्यानंतर तो फॉर्म जो आहे, तो मंजूर केला जाईल आणि त्यानंतर तुमचा स्टेटस आहे ते चेंज होईल.
यामध्ये तुम्हाला काय घाबरायची गरज नाही. तुम्ही तुमचं काम केलेलं आहे. आता फॉर्म पेंडिंग आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो तो सरकारकडे पेंडिंग आहे. सरकारी अधिकारी तो फॉर्म चेक करतील, त्यामध्ये काही तोटे असतील तर तुम्हाला सांगतील, ते दुरुस्तीसाठी सुद्धा पाठवू शकतात. आणि जर त्यामध्ये काही चुका नसतील तर तुमचा फॉर्म केला जाईल, त्यानंतर तिथून पुढे तुमचे जे काही पैसे आहेत, ते पैसे तुम्हाला मिळतील. तर काही प्रॉब्लेम नाही, फॉर्म पेंडिंग मध्ये आहे तर लाखो फॉर्म पेंडिंग मध्ये आहेत. तर काही चिंता करायची गरज नाही. पुढचे काही प्रश्न आहेत ते आपण घेऊयात.
इमेज नॉट सपोर्ट प्रॉब्लेम?
आता भरपूर जणांना एक प्रॉब्लेम होते, तो म्हणजे इमेज नॉट सपोर्ट. तुम्ही स्क्रीन वरती दाखवतो अशा पद्धतीने प्रॉब्लेम येतो आणि कोणतेही डॉक्युमेंट दिसत नाहीत. पासपोर्ट साईज फोटो काढला असेल किंवा लाईव्ह फोटो काढला असेल, तर तो तुम्हाला तिथे दाखवला जात नाही. तर हा प्रॉब्लेम काय आहे? हा प्रॉब्लेम तुमचा नाही, हा प्रॉब्लेम ॲपचा आहे. त्यामुळे तुम्हाला काही घाबरायची गरज नाही. तुम्हाला अशा पद्धतीने जर दाखवत असेल हा स्क्रीन वरती फोटो अशा पद्धतीने दाखवत असेल, तर तुम्ही बिनधास्त फॉर्म तुम्ही सबमिट करा आणि ओटीपी टाकून तो फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता, काही तुम्हाला अडचण येणार नाही. हाय याचा प्रॉब्लेम आहे.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू शकतो का?
पुढचा प्रश्न आहे पासपोर्ट साईज फोटो तो आम्ही अपलोड करू शकतो का असे भरपूर जण विचारतात. तर जो काही नवीन जीआर काल आलेला आहे त्यानुसार तुम्ही आता जो काही पासपोर्ट साईज फोटो आहे तो तुम्ही अपलोड करू शकता. लाईव्ह सुद्धा अपलोड करू शकतो, आणि पासवर्ड पासपोर्ट साईटचा फोटो सुद्धा तुम्ही आता अपलोड करू शकणार आहात.
अधिवास प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड अपलोड करू शकतो का?
जे काही उत्पन्न दाखला ज्यांच्याकडे नाहीये, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीये, त्यांनी स्वघोषणापत्र अपलोड करू शकतो का असे विचारतात. तर याचा उल्लेख कोणत्याही जीआर मध्ये अजून करण्यात आला नाहीये. भरपूर घोषणा वगैरे झाल्या असतील, तर जीआर मध्ये याचा उल्लेख नाहीये. त्यामुळे स्वघोषणापत्र तुम्ही अपलोड करू नका. तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, तर उत्पन्नाचा दाखला अपलोड करा. उत्पन्नाचा दाखला नसेल, तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता.
वेबसाईट पोर्टल कधी येणार?
तर वेबसाईट पोर्टल सुद्धा येणार आहेत. एका आठवड्याच्या आत मध्येच वेबसाईटचे असेल पोर्टल असेल ते येईल. तर ज्यांना असतील माही सेवा केंद्र चालक असतील, तर त्यांना यावरती सुविधा मिळणार आहे. त्यांचं लॉगिन करून आणि त्यांना कमिशन सुद्धा 50 रुपये देण्यात येणार आहेत.
ॲप मधून कितीही फॉर्म भरू शकतो का?
मधून तुम्ही कितीही आणि कोणीही कोणताही व्यक्ती कितीही फॉर्म भरू शकतो. तसं बनवलं आहे. तुम्ही घरबसल्या फॉर्म भरा, तुम्ही कोणाचेही फॉर्म भरा. अॅप असं बनवलं आहे की त्यामध्ये कोणालाही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. घरबसल्या कोणीही कितीही कोणाचेही फॉर्म भरू शकता. तर हा प्रश्न तुमचा क्लिअर झाला असेल.
जन्मतारीख, नाव, जिल्हा चुकला असल्यास?
आधार कार्ड अपडेट करूनच फॉर्म भरा.
अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला या दोन्ही ठिकाणी आम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकतो का?
अधिवास प्रमाणपत्र जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पंधरा वर्षांपूर्वीच रेशन कार्ड जर असेल, तर तुम्ही अपलोड करू शकता. जर 15 वर्षांपूर्वीच जर ते रेशन कार्ड नसेल, तर तुम्ही त्या दोन नंबरच्या ऑप्शन मध्ये म्हणजे अधिवास प्रमाणपत्र मध्ये तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकत नाही. हा पण क्लिअर झाला. मग रेशन कार्ड तुम्ही कुठे अपलोड करू शकता? तर कोणतेही रेशन कार्ड तुम्ही म्हणजे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुम्ही उत्पन्नाचा जो दाखला आहे, तिथे तुम्ही अपलोड करू शकता. तिथे तुम्हाला अट नाहीये पंधरा वर्षाची. तुमचं नवीन रेशन कार्ड असू द्या किंवा जुने रेशन तुम्ही त्या ठिकाणी म्हणजेच उत्पन्नाच्या दाखल्याच्या ठिकाणी तुम्ही तुमचं पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड अपलोड करू शकता. हा पॉईंट क्लिअर झाला.
जॉईन खातं चालेल का?
तर जॉईन खातं चालणार नाही. जॉईन खात्यामध्ये कसं असतं, कधी जॉईन खातं मुलीचं असतं, कधी मुलाचं जॉईन खातं असतं किंवा पतीचं जॉईंट असतं, तर अशा ठिकाणी वडिलांचं जॉईंट असतं. अशा ठिकाणी काय होतं, जे काही पैसे आहेत ते तुम्हाला बरोबर येणार नाहीत. कारण आधार कार्ड ने पैसे येणार आहेत. काही ठिकाणी आधार लिंक वडिलांचं असतं किंवा आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे जॉईन खातं अपलोड करू नका. सिंगल जे काही अकाउंट आहे ते तुम्ही नवीन काढू शकता आणि ते खातं महिलांनी अपलोड करणे गरजेचे आहे.