Mahesh Babu: साऊथ सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दु:खाचा डोंगर, आईचे निधन

WhatsApp Group

Mahesh Babu’s Mother Indira Devi Passes Away: साऊथचे लोकप्रिय स्टार महेश बाबू यांची आई इंदिरा देवी यांचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे पहाटे चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्या ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांच्या पत्नी होत्या.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पार्थिवावर महाप्रस्थानममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पद्मालय स्टुडिओमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.