महात्मा गांधींच्या हत्येसाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला शस्त्रे मिळवून दिली – तुषार गांधी

WhatsApp Group

राहुल गांधींनी वीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ सुरु आहे. त्याचवेळी या प्रकरणात महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी सावरकरांना गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला मदत केली होती असं विधान केलं आहे. सावरकरांनीच नथुराम गोडसेला शस्त्र पुरवले होते, असे ट्विट त्यांनी केले.

तुषार गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “सावरकरांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही तर त्यांनी बापूंना मारण्यासाठी नथुराम गोडसेला चांगली बंदूक मिळवून देण्यासही मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत नथुराम गोडसेकडे कोणतेही चांगले शस्त्र नव्हते.असं तुषार गांधी म्हणाले आहेत.

दुसऱ्या ट्विटमध्ये तुषार गांधी यांनी लिहिले की, “1930 च्या दशकात बापूंना मारण्याचे अनेक प्रयत्न झाले. प्रबोधनकार ठाकरे (बाळासाहेब ठाकरे यांचे वडील) यांनी बापूंच्या साथीदारांना अकोला आणि विदर्भातील हत्येचा कट असल्याचा इशारा दिला. यानंतर आणखी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, “सावरकर आणि हेडगेवार हे हिंदू संघटनेचे नेते होते, त्यामुळे प्रबोधनकारांचा इशारा त्यांनाच उद्देशून होता. अशा इतिहासाने शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून दिली पाहिजे.

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीही राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत भाग घेतला आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा येथे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला पोहोचल्यावर शुक्रवारी (18 नोव्हेंबर) तुषार गांधी राहुल गांधींशी हस्तांदोलन करताना दिसले.