नवी दिल्ली – नवी दिल्ली येथील राजपथावर ७३व्या प्रजासत्ताकदिन निमित्त झालेल्या चित्ररथ पथसंचलनात महाराष्ट्राने केलेले सादरीकरण सर्वांच्याच पसंतील पडले आहे. महाराष्ट्राच्या ‘जैवविविधता मानके’ या चित्ररथाने लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार आपल्या नावावर केला आहे. यावर्षी प्रथमच ऑनलाईन मतदानाद्वारे चित्ररथाची निवड झाली आहे.
अभिनंदन #महाराष्ट्र!
महाराष्ट्राच्या ‘जैवविविधता मानके’ या चित्ररथाने लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार पटकाविला. नवी दिल्ली येथील राजपथावर #प्रजासत्ताकदिन निमित्त झालेल्या #चित्ररथ पथसंचलनात महाराष्ट्राने उत्तम सादरीकरण केले. यावर्षी प्रथमच ऑनलाईन मतदानाद्वारे चित्ररथाची निवड झाली pic.twitter.com/4KNTnxdLLE— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 4, 2022
प्रजासत्ताकदिनाच्या चित्ररथात महाराष्ट्राचा ‘शेकरू’ हा राज्यप्राणी, ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखरू यासह राज्यातील जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात आली होती.
राज्य शासनाने प्राणी,पक्षी व अन्य जीवांसाठी राखीव ठेवलेल्या अभयारण्यातील दुर्मिळ वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातीही चित्ररथावर दर्शविण्यात आल्या होत्या.