
Maharashtra Vidhan Parishad Election : राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक आज होत असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजपा चमत्कार घडवणार याबाबत सर्वांनाच प्रचंड उत्कंठा लागली आहे. विधान परिषदेच्या वारीत विजयाचा गुलाल कोण उधळणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.शिवसेनेकडून सचिन अहीर, आमशा पाडवी रिंगणात आहेत. तर भाजपाकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उपा खापरे आणि प्रसाद लाड असे पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना तिकीट दिलं आहे. तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आपलं नशिब आजमावत आहेत.
- राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि भाजपचे राम शिंदे विजयी
- विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.
- भाजपाचे विजयी उमेदवार- प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे, प्रसाद लाड