महाराष्ट्रात मास्क लावणे गरजेचे नाही? ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

WhatsApp Group

मुंबई – आज दुपारी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मास्क संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. युरोप, इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक देशांनी मास्क न वापरण्याची भूमिका घेतली आहे. यावर आपणही अशी भूमिका घेऊ शकतो का? यावर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात आता मास्क वापरण्याची गरज नाहीय, अशी चर्चाही यावेळी झाली. मास्कच्या बाबतीत लवकरच टास्क फोर्सशी चर्चा करणार आहे. टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबत निर्णय घेतला जाईल. अशी चर्चा या बैठकीत झाली.

राज्यात कोरोना संसर्गाची परिस्थिति पाहता चौथी आणि पाचवी लाट येण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितिचा सखोल अभ्यास करूनच राज्य सरकार मास्क बाबत निर्णय घेणार आहे.