पुणे – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षांबाबत एक मोठी अपडेट बोर्डाकडून समोर आली आहे. उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट Maharashtra SSC Hall Ticket देण्यात येणार आहे. दुपारी 1 नंतर विद्यार्थ्यांना हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे. अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून देण्यातं आली आहे.
गेल्या काही दिवसात कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असल्यामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षाचं काय होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुलांचे लसीकरण करत शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
त्यानंतर परीक्षा ऑनलाईन घ्या, ऑफलाईन घ्या या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले होते. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन देखील करण्यात आलं होतं. मात्र शासनाने परीक्षेचा निर्णय बदलला नाही. परीक्षा ऑफलाईनच होतील हे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा
धक्कादायक! जेवण उशिरा बनवल्याने पत्नीला डिझेल ओतून जिवंत जाळलं
८ महिन्यांच्या बाळासोबत मोलकरीणीने केलेलं हे कृत्य ऐकून अंगावर उभा राहिल काटा!