राज्यातील शाळा सुरू होणार, उद्धव ठाकरेंनी दिली परवानगी

WhatsApp Group

मुंबई – कोरोना महामारीच्या काळात बंद असलेल्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने ( Government of Maharashtra )घेतला आहे. यानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत (school reopen from 4 October).

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने ( maharashtra education department ) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मान्यता दिली असल्याने राज्यातील शाळा सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

कोरोनाच्या नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सारकरने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरू होतील असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू ( Bachchu Kadu ) यांनी एका वृत्तवाहिनशी बोलताना सांगितले.

कोरोनाच्या महामारीमुळे या वर्षीदेखील ऑनलाइन पद्धतीने शैक्षणिक ( online education ) वर्ष सुरु करावे लागले. मुलांचे शिक्षण हे आतापर्यंत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलं. अखेर राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

(CORONA) संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने, शाळा सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. शाळा कोणत्या वर्गांची व कोणत्या पद्धतीने, कोणत्या वेळेत सुरू होतील. या संदर्भातील कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही.

शाळा सुरू करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून असून सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.