
Maharashtra School : राज्यात कोरोनाने (Corona Virus) पुन्हा डोकं वर काढले आहे. कोरोना रुग्णसंख्या (Corona Patient) पुन्हा वाढू लागल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाच्या भीतीदरम्यान शाळा (Maharashtra School) नेमक्या कधी सुरु होणार असा प्रश्न सर्व पालकांना पडला होता. अशामध्ये राज्यातील शाळा या 13 जूनपासूनच सुरु होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी सांगितलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना रविवारी वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.
शाळेतील विद्यार्थी, शिक्षण आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी मास्कसक्ती केली जाणार का? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल, असं देखील वर्षा गायकवाड यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सर्वांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळा सुरक्षितपणे करण्याच्या अनुशंगाने सर्व खबरदारी घेत काळजी बाळगली जाईल,
तसंच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लवकरच नवीन नियमावली जाहीर केली जाईल. सर्व शाळांना ही नियमावली बंधनकारक असणार आहे. असे देखील वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.