
महाराष्ट्र स्कॉलरशीप परीक्षेचा अंतिम निकाल (Maharashtra Scholarship Exam 2022 Final Result) जाहीर करण्यात आला आहे. 31 जुलैला परीक्षा पार पडल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE Pune) या परीक्षेचा अंतरिम निकाल 7 नोव्हेंबर दिवशी जाहीर केला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांना, शाळांना गुणपडताळणी आणि निकालाबाबत अन्य तांत्रिक आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला होता. दरम्यान आता या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईट वर निकाल जाहीर करण्यात आली आहे. mscepune.in आणि mscepuppss.in वर तुम्ही निकाल पाहू शकता.
शिष्यवृती परीक्षेचा निकाल कसा पहाल?
- mscepune.in किंवा mscepuppss.in वर क्लिक करा.
- होम पेज वर रिझल्ट लिंक पहा.
- आता नव्या विंडो मध्ये तुमचा 11 अंकी आसन क्रमांक टाका.
- त्यानंतर विषयनिहाय तुम्ही निकाल पाहू शकाल.