मुंबई – महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूचे 27 हजार 971 नवीन रुग्ण आढळले असून 61 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रुग्ण सापडल्यानंतर आत्ता राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 44 हजार 344 वर पोहोचली आहे Maharashtra reports 27971 fresh covid cases .
राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत 50 हजार 142 रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases – 27,971
*⃣Recoveries – 50,142
*⃣Deaths – 61
*⃣Active Cases – 2,44,344
*⃣Total Cases till date – 76,83,525
*⃣Total Recoveries till date – 72,92,791
*⃣Total Deaths till date – 1,42,522
*⃣Tests till date – 7,43,33,720(1/5)????
— PIB in Maharashtra ???????? (@PIBMumbai) January 29, 2022
ओमिक्रॉनचे 85 नवीन रुग्ण
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराचे 85 रुग्ण आढळले आहेत. यानंतर राज्यात ओमिक्रॉन प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 3,125 झाली आहे.