गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे २५,४२५ नवे रुग्ण, एवढ्या रुग्णांचा मृत्यू

WhatsApp Group

मुंबई – गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 25 हजार 425 नवीन रुग्ण आढळले असून 42 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे Maharashtra reports 25,425 fresh COVID cases in the last 24 hours. नवीन रुग्ण आल्यानंतर राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आत्ता 2,87,397 वर पोहोचली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 24 तासांत कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराचे 72 रुग्ण आढळले आहेत. तर दरम्यान 36,708 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.


बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कमी बाधित आढळले ही दिलासादायक बाब आहे. बुधवारी राज्यात 35,756 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

ओमिक्रॉनचे ७२ रुग्ण आढळले

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराचे 72 रुग्ण आढळले आहेत. राज्यात ओमिक्रॉन प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 2930 झाली आहे. त्यापैकी 1592 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.