मुंबई – महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूचे 13,840 नवीन रुग्ण आढळले असून 81 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे Maharashtra reported 13840 new cases. राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत 27 हजार 891 रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत.
राज्यातील 3 शहरांमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. पुणे शहराबद्दल बोलायचे झाले तर येथे 2 हजार 126 नवीन रुग्ण आढळले आहेत. नागपूर शहरात 1 हजार 175 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1 हजार 89 नवे रुग्ण आढळले आहेत Maharashtra COVID19 Updates.
#COVID19 | Maharashtra reported 13,840 new cases, 27,891 recoveries, and 81 deaths, in the last 24 hours.
No new case of Omicron today. pic.twitter.com/8VvmOwhOhT
— ANI (@ANI) February 4, 2022
ओमिक्रॉनचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही
महाराष्ट्रासाठी एक मोठी खुशखबर असून आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराचा एकही नवीन रुग्ण राज्यात आढळलेला नाही.