
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आता कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आयएमडीकडून याबाबत माहीती देण्यात आली आहे.