महाराष्ट्र प्रीमियर लीगचा महासंग्राम आजपासून, लाईव्ह सामना कुठे, कधी आणि कसा पाहणार, घ्या जाणून

0
WhatsApp Group

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीग (MPL 2023) स्पर्धा (15 जून) आजपासून सुरु होत आहे. काही दिवसापूर्वी या लीगसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली होती. पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी या सहा संघामध्ये ही स्पर्धा खेळली जाणार आहे.

या स्पर्धेत ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, राहुल त्रिपाठी आणि केदार जाधव हे स्टार खेळाडू खेळणार आहेत. लीगचा पहिला सामना पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्सशी होणार आहे. सर्व सामने एमसीए स्टेडियम, पुणे येथे खेळवले जातील. सामने दुपारी 2 वाजता सुरू होतील आणि रात्री 8 वाजता संपतील. कोणत्याही प्रतिकूल हवामानाच्या बाबतीत सर्व सामन्यांमध्ये राखीव स्थान असेल. या लीगमध्ये महाराष्ट्रातील विविध शहरांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सहा संघांचा समावेश असेल, जे संपूर्ण स्पर्धेत एकूण 19 सामने खेळतील. छत्रपती संबाजी किंग्ज, ईगल नाशिक टायटन्स, कोल्हापूर टस्कर्स, 4 एस पुणेरी बाप्पा, रत्नागिरी जेट्स आणि सोलापूर रॉयल्स हे सहा संघ या स्पर्धेत आहेत.

सामने कुठे पाहू शकता?

फॅनकोड या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहे. तसेच सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्टस या वाहिनीवर करण्यात येईल! डिश टीव्ही चॅनल नं. 640, एअरटेल चॅनल नं. 298, व्हिडिओकॉन चॅनल नं. 646, टाटा स्काय चॅनल नं. 453 आणि सन डायरेक्ट चॅनल नं. 302 या चॅनलवर तुम्ही सामन्याचा आनंद घेऊ शकता.

पहा संपुर्ण वेळापत्रक
15 जून 2023 –
सांयकाळी 08 वाजता – पुणेरी बाप्पा vs कोल्हापूर टस्कर्स
16 जून 2023 –
दुपारी 02 वाजता – इगल नाशिक टायटन्स vs छत्रपती संभाजी किंग्स
सांयकाळी 08 वाजता – रत्नागिरी जेट्स vs सोलापूर रॉयल्स
17 जून 2023 –
सांयकाळी 08 वाजता – कोल्हापूर टस्कर्स vs रत्नागिरी जेट्स
18 जून 2023 –
दुपारी 02 वाजता – इगल नाशिक टायट्नस vs सोलापूर रॉयल्स
सांयकाळी 08 वाजता – पुणेरी बाप्पा vs छत्रपती संभाजी किंग्स
19 जून 2023
सांयकाळी 08 वाजता – पुणेरी बाप्पा vs इगल नाशिक टायट्नस
20 जून 2023 –
दुपारी 02 वाजता – सोलापूर रॉयल्स vs कोल्हापूर टस्कर्स
सांयकाळी 08 वाजता – रत्नागिरी जेट्स vs छत्रपती संभाजी किंग्स
21 जून 2023 –
सांयकाळी 08 वाजता – इगल नाशिक टायट्नस vs रत्नागिरी जेट्स
22 जून 2023 –
दुपारी 02 वाजता – छत्रपती संभाजी किंग्स vs कोल्हापूर टस्कर्स
सांयकाळी 08 वाजता – पुणेरी बाप्पा vs सोलापूर रॉयल्स
23 जून 2023 –
सांयकाळी 08 वाजता – सोलापूर रॉयल्स vs छत्रपती संभाजी किंग्स
24 जून 2023
दुपारी 02 वाजता – पुणेरी बाप्पा vs रत्नागिरी जेट्स
सांयकाळी 08 वाजता – कोल्हापूर टस्कर्स vs इगल नाशिक टायट्नस
सांयकाळी 08 वाजता – 25 जून 2023 – क्वालिफायर 1
सांयकाळी 08 वाजता – 26 जून 2023 – एलिमेनर
सांयकाळी 08 वाजता – 27 जून 2023 – क्वालिफायर 2
सांयकाळी 08 वाजता – 29 जून 2023 – फायनल