
मुंबई – नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पाठिंब्याने स्थापन झालेले सरकार 4 जुलै रोजी म्हणजे उद्या बहुमत सिद्ध करणार आहे. विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवारपासून सुरू होत आहे. सकाळी 11 वाजता विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहाच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
दरम्यान, शिवसेनेचे विधीमंडळ पक्ष कार्यालय सील करण्यात आलं आहे. कार्यालयाबाहेर एक नोटीस चिकटवण्यात आली असून, त्यामध्ये शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या सूचनेनुसार हे कार्यालय बंद असल्याचं लिहिलं आहे.