
मुंबई : राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती Maharashtra Police Bharti 2022 करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (24 ऑगस्ट) विधानसभेत दिली. विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना फडणवीसांनी ही माहिती दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
राज्यात 14 हजार जागांसाठी पोलीस भरती होईल. तसेच सध्या 7 हजार जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. तसेच पुढील काळात आणखी 7 हजार जागांवर पोलीस भरती केली जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी पोलीस भरतीबाबत पश्न विचारला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं.