
राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून राज्यात एकूण ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागातून सर्वाधिक ९७.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला असून ९०.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना निकाल दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे…
- कोकण- ९७.२१ टक्के
- पुणे- ९३.६१ टक्के
- नागपूर- ९६.५२ टक्के
- औरंगाबाद- ९४.९७ टक्के
- मुंबई- ९०.९१ टक्के
- कोल्हापूर- ९५.०७ टक्के
- अमरावती- ९६.३४ टक्के
- नाशिक- ९५.०३ टक्के
- लातूर- ९५.२५ टक्के