महाराष्ट्र सरकारने दारू केली खूप स्वस्त, दारूवरील एक्साईज ड्युटी केली कमी

WhatsApp Group

मुंबई – महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेत आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे राज्यातील आयात केलेली दारूची किंमत कमी होणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चाच्या 300 टक्क्यांवरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्रालाा दरवर्षी 100 कोटींचा महसूल मिळतो. या कपातीमुळे राज्य सरकारचा महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.

शुल्कात कपात केल्यामुळे स्कॉचची तस्करी कमी होणार आहे. तसेच राज्यात आयात होणाऱ्या व्हिस्कीच्या किमतीही कमी झाल्या आहेत. याचा थेट परिणाम राज्याच्या महसुलात होणार असून महसुल मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. समोर आलेल्या माहितीनूसार राज्यात सध्या एका दिवसात 1 लाख बाटल्या विकल्या जातात, मात्र आता शुल्क कमी झाल्याने विक्रीच वाढ होऊन अडीच लाख बाटल्यांची विक्री होण्याचा अंदाज आहे. दारूपासून महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक महसूल मिळतो.

एकीकडे सर्वच वस्तू महाग होत असताना महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेला कमी किमतीत आयात स्कॉच मिळू शकणार आहे. मात्र असं असलं तरी एकीकडे डिझेल-पेट्रोलवरील वॅट महाराष्ट्र सरकार कमी कारायला तयार नाही आणि दुसरीकडे आयात स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क कमी करत असल्याने राज्यातील काही नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली आहे.