Maharashtra Din 2024 Wishes in Marathi | महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

0
WhatsApp Group

Maharashtra Din 2024 Wishes in Marathi: भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता आणि भारतातील अनेक राज्ये सारखीच होती. पण हळूहळू ही राज्ये भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर विभागली गेली आणि अशा प्रकारे भारतातील अनेक नवीन राज्ये निर्माण झाली. ज्यांच्या स्वतःच्या वेगवेगळ्या भाषा आणि वेशभूषा आहेत. त्याच वेळी, भारतातील जवळजवळ सर्व राज्ये देखील दरवर्षी त्यांच्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करतात आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही दरवर्षी मे महिन्यात स्थापना दिवस साजरा केला जातो.

Maharashtra Din Quotes In Marathi | महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

1. “महाराष्ट्र दिनाला तुमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना पाठवा हे महाराष्ट्र दिवस शुभेच्छा.”

2. “भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा… जय जय महाराष्ट्र देशा.”

3. “बहु असोत सुंदर संपन्न की महा…प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

4. “शिव निष्ठा येथ असे सतत जागती…अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

5. “भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा .”

6. “पैठणचे प्रेम अमित देश कोकणा… पंढरीस ये विदर्भ देवदर्शना… अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

7.”बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

8.”छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र… माझ्या राजाचा महाराष्ट्र…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

9. “जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी…. मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

10. “लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

11. “महाराष्ट्रीयन असण्याचा मला अभिमान आहे. राज्य जे सर्वांसाठी आणि भारतासाठी अभिमानास्पद आहे. जय महाराष्ट्र.”

12. “आजच्या शुभ दिवशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी महाराष्ट्र दिन.”

13. “महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

14. “महाराष्ट्राच्या या सुवर्ण दिवशी आपण एकत्र येऊन शपथ घेऊया की, महाराष्ट्राला येत्या वर्षात नव्या उंचीवर नेऊ. “

15. “महाराष्ट्रात माझी जडणघडण झाली याचा मला अभिमान आहे. माझ्या माय मराठीचा मला अभिमान आहे. इथली संस्कृती तिचाही मला अभिमान आहे. महाराष्ट्र दिन 2022 च्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.”

16. “जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

17. “लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी… मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.”

18. “प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा ! महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा.”

19. “मंगल देशा… पवित्र देशा… महाराष्ट्र देशा…प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

20. “गर्जा महाराष्ट्र माझा…. जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.”

21. “राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा…. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.”

22. “कपाळी केशरी टिळा लावितो… महाराष्ट्र देशा तुला वंदितो…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

23. “दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा… जय जय महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

24. “ज्ञानाच्या देशा ,प्रगतीच्या देशा आणि संताचा देशा… महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.”

25. “महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्व मराठी बांधवाना मनपूर्वक शुभेच्छा.”

26. “इतरांना पडला असेल विसर पण या सोनेरी दिवसासाठी जे झाले हुतात्मा त्यांचं ही होऊ दे स्मरण महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

27. “सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया. एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया. महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश.”

28. “दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

29. “पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन
आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश.”

30. “धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”