महाराष्ट्रात कोरोना विस्फोट, 43 हजारांहून अधिक नवे रुग्ण तर 136 पोलिसांना कोरोनाची लागण

WhatsApp Group

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे 43 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 19 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात ओमिक्रॉनचे 238 नवे रुग्ण मिळाले आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे 2 लाख 61 हजार 658 रुग्ण सक्रिय आहेत ( Maharashtra COVID 19 Updates ).

शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 43 हजार 211 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 33 हजार 356 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी मुंबईतील 11 हजार 317 नवे कोरोना रुग्ण मिळाले आहेत. कास महाराष्ट्रात एकूण १९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील एकट्या मुंबईत नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनूसार पॉझिटिव्ह आढळलेले 84 टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत.


महाराष्ट्रात ओमिक्रॉनची 238 नवीन प्रकरणे आहेत. राज्यात ओमिक्रॉनचा आकडा 1605 वर पोहोचला आहे. मुंबईत काल संध्याकाळपर्यंत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 84 हजार 352 एवढी होती.

136 पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे की, गेल्या 24 तासांत 136 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 126 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

 

अधिक बातम्या वाचा 

धक्कादायक बातमी: दारू पिल्याने पाच जणांचा मृत्यू

पुजारा आणि रहाणेला आता संघाबाहेर काढा, सोशल मीडियावर चाहत्यांची मागणी

24 तासांत भारतात आढळले 2 लाख 68 हजार 833 कोरोना रुग्ण, तर एवढ्या लोकांचा झाला मृत्यू