मुंबई : महाराष्ट्रात Maharashtra गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूचे 1,635 नवीन रुग्ण आढळले असून 29 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे Maharashtra reported 1635 new cases. राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत 4 हजार 394 रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत.
सध्या राज्यात 18,368 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात रिकवरी रेट 97.89% व मृत्यू दर 1.82% नोंदवला गेला. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर गेल्या 24 तासांत 237 लोक ओमिक्रॉनमधून बरे झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 4,456 लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. त्यापैकी 3,768 जणांची RT-PCR चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 8,904 नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 7991 चा अहवाल प्राप्त झाला असून 913 चा अहवाल प्रलंबित आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases – 1,635
*⃣Recoveries – 4,394
*⃣Deaths – 29
*⃣Active Cases – 18,368
*⃣Total Cases till date – 78,56,994
*⃣Total Recoveries till date – 76,91,064
*⃣Total Deaths till date – 1,43,576
*⃣Tests till date – 7,71,29,145(1/5)????
— PIB in Maharashtra ???????? (@PIBMumbai) February 19, 2022