राज्यात कोरोनाचा विस्फोट, मंगळवारी राज्यात १८८१ नव्या Corona रुग्णांची नोंद

WhatsApp Group

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाची (corona) तिसरी लाट ओसरली असताना, आता आजच्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने चौथ्या लाटेची धास्ती वाढवली आहे. आज मुंबईमध्ये कोरोना रुग्णांत दुप्पट वाढ झाली आहे. मुंबईत १२४२ रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आज एकाच दिवसात १८८१ रुग्ण आढळले आहेत.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्याची रुग्णांची संख्या ७४ आहे, यापैकी १० रुग्ण अतिदक्षता विभागात तर ४ रुग्ण अत्यावस्थ आहेत. आज मुंबईत एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही.

राज्यात काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण घटले होते, आता कोरोनाने (Corona) पुन्हा डोके वर काढले आहे. आज राज्यात १८८१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसातील आजची आकडेवारी ही सर्वात जास्त आहे. काल १ हजार ८० रुग्ण नोंदवले होते. आज रुग्णांत दुप्पट वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

चिंतेची बाब म्हणजे राज्यात आज बीए ५ व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. पुण्यातील महिलेमध्ये हा व्हेरिएंट आढळला. बीजे मेडिकल कॉलेजनुसार, जीनोम सिक्वेसिंगच्या रिपोर्टमधून हा खुलासा झाला. त्यात पुण्यातील ३१ वर्षीय महिलेला बीए ५ व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आले.