राज्यात पहिल्यांदाच आढळले B.A.4 आणि B.A 5 विषाणूचे ७ रुग्ण

WhatsApp Group

पुणे – महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण (corona) दिवसागणिक वाढत असून, राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत भर पाडणारा अहवाल आता समोर आला आहे. ओमिक्रॉनच्या B.A 4 व्हेरियंट आणि B. A 5 या व्हेरियंटने राज्यात डोके वर काढले असून, पहिल्यांदाच राज्यात या व्हेरियंटचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. या दोन्ही व्हेरियंटचे एकूण ७ रुग्ण असून, ते पुण्यातील आहेत.

पुण्यातील बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाने सुरू असलेल्या जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार पुणे शहरामध्ये BA.4 व्हेरियंटचे चार तर BA.5 व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळून आले आहेत.