दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती, प्रात्यक्षिक परीक्षेची तारीख जाहीर

WhatsApp Group

मुंबई – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2022 च्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत SSC and HSC practical exam.

मंडळाने दिलेल्या माहितीनूसार दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होणार आहे. तर महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी 2022 पासून घेण्यात येणार आहेत.

दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in या वेबसाइटला भेट देऊ शकता.