अयोध्येत ‘महाराष्ट्र भवन’ बांधणार; एकनाथ शिंदेंच्या मागणीला योगींनी दिली मंजूर

WhatsApp Group

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते मायानगरीतील उद्योगपती, बँकर्स आणि चित्रपट जगतातील लोकांना भेटतील. यादरम्यान योगी उद्योगपतींना उत्तर प्रदेशातही गुंतवणूक करण्याचे आवाहन करणार आहेत. योगींचे मुंबईत आगमन होताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात त्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा देण्याची मागणी योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीला योगी आदित्यनाथ यांनीही मान्यता दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, लवकरच आपण सर्वजण प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत येऊ. ज्यावर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने त्यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रणही दिले आहे. या चर्चेवेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग आणि भाजप खासदार आणि चित्रपट अभिनेते रवी किशन हेही उपस्थित होते. यावेळी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईकही उपस्थित होते.