कोकणात राडा, बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 

WhatsApp Group

सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे बंडखोरीदेखील वाढली आहे. सगळ्याच पक्षात बंडखोरी पाहायला मिळत आहे. दरम्यान कोकणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावंतवाडी मतदारसंघातून बंडखोरी करणारे भाजपचे विशाल परब यांच्या गाडीवर रात्रीच्या सुमारास हल्ला झाला. विशाल परब त्यांच्या वाहन चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने ते बचावले. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर परप्रांतीय असल्याचं समोर आलं आहे.

सावंतवाडीचे विद्यमान आमदार शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून राजन तेली निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपकडून या ठिकाणाहून विशाल परब यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने महायुतीत ही जागा शिंदे गटाला सोडली. त्यानंतर विशाल परब यांनी बंड करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.