
आज अक्षय्य तृतिया…. साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक… आजच्या या शुभदिनानिमित्त पुण्यामधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्यावतीने दरवर्षी अक्षयतृतीये निमित्त हा आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात येतो.
बाप्पाच्या गाभाऱ्याला या आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. हे आंबे ऊद्या पुण्यातील ससून हॉस्पीटलमधील रुग्ण, अनाथाश्रम,वृद्ध आश्रम ,दिव्यांग आणि भाविंकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे. आंब्यांची ही आरास पाहण्यासाठी भाविकांची आज सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे.