फक्त २ मिनिटात मिळवा ग्रामपंचायतचे दाखले तेही आपल्या मोबाईलवर, वाचा पूर्ण माहिती

WhatsApp Group

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे आता सर्व नागरिकांना ग्राम पंचायतचे सर्व दाखले घरबसल्या मिळणार मिळणार आहे. मित्रांनो शासनाच्या ‘महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट’ अ‍ॅपच्या मदतीने ग्राम पंचायतीतील सर्व दाखले grampanchayat certificate आपल्या मोबाइलमध्ये आपल्याला मिळू शकतात देणार आहे. या अ‍ॅपमुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

ग्रामपंचायतीचे सर्व दाखले मिळणार घरपोच : ग्रामपंचायतीमधून जन्म दाखला, विवाह नोंदणी दाखला, मालमत्ते संबंधित दाखले, तसेच घरपट्टी, पानी पट्टी कर भराणा करायचा असल्यास आता तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही महा-ई-ग्राम ॲप द्वारे हे करू शकता. वेगवेगळे दाखले मिळवण्यासाठी अनेकदा आपल्याला ग्रामपंचायतीला जावे लागायचे मात्र आता शासनाकडून महा-ई-ग्राम ॲपच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाईन या सुविधा मिळणार आहेत.गुगल प्लेवर हे ॲप उपलब्ध असून तेथुन तुम्ही हे अ‍ॅप डाउनलोड करू शकता.

नागरिकांसह ग्रामपंचायतीलाही होणार फायदा : ग्रामपंचयातीमध्ये काम करत असलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांची माहिती या अ‍ॅपमध्ये असणार आहे. याव्यतिरिक्त आपले सरकार सुविधा आणि सूचना पेटी हे पर्यायही उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. या सर्वांचा वापर लोक विविध सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

‘महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट’ अ‍ॅपच्या माध्यमातून खालील सुविधा मिळणार आहे : १)जन्म प्रमाणपत्र २) विवाह नोंदणी प्रमाणपत्र ३) मृत्यू प्रमाणपत्र ४) दारिद्य्र रेषेखालील प्रमाणपत्र ५)असेसमेंट उताऱ्यासाठीचा अर्ज

महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट अ‍ॅपची अशी करा नोंदणी : गुगल प्ले-स्टोअर मध्ये जाऊन mahaegram Citizen Connect हे सर्च केल्यावर जे अ‍ॅप येईल ते डाउनलोड करा. त्यानंतर ॲपमध्ये आपली संपूर्ण माहिती भरा आणि लॉगिन करा. लॉगिन केल्यावर सुविधाचा वापर तुम्हाला करता येईल .