“महाकुंभ चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची आर्थिक मदत” मुख्यमंत्री योगींची घोषणा

WhatsApp Group

महाकुंभ चेंगराचेंगरीत पीडित कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. बुधवारी रात्री झालेल्या अपघातानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना भरपाईची घोषणा केली. माध्यमांना निवेदन देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे; संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी ३ सदस्यीय पथकाद्वारे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीश हर्ष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अहवाल तयार केला जाईल. हा अपघात का आणि कसा झाला याची चौकशी केली जाईल.