माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. प्रयागराज येथे मेडिकलसाठी नेत असताना गोळ्या घालून ही हत्या करण्यात आली आहे. अतिक आणि त्याच्या भावावर गोळी कोणी मारली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या गोळीबारात अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी, अतिकचा मुलगा असद अहमद आणि शूटर गुलाम यांना पोलिसांनी चकमकीत ठार केले होते.
Uttar Pradesh | Mafia-turned-politician Atiq Ahmed and his brother Ashraf Ahmed shot dead while being taken for medical in Prayagraj. pic.twitter.com/8SONlCZIm0
— ANI (@ANI) April 15, 2023
प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ ही घटना घडली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यादरम्यान संपूर्ण परिसराचे छावणीत रूपांतर होते. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, त्यात हल्लेखोरांनी अतिकच्या डोक्यात बंदुकीतून गोळ्या झाडल्या आहेत. पोलिसांनी 3 हल्लेखोरांनाही अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर बनावट मीडिया पर्सन म्हणून आले होते.
#AtiqueAhmed और अशरफ़ अहमद की हत्या का वीडियो! pic.twitter.com/O58AzcgQwN
— Prashant Umrao (@ippatel) April 15, 2023
शनिवारी प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजजवळ अतिक अहमद आणि अशरफ यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. दोघांची हत्या झाली त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, बनावट मीडियावाले म्हणून काही लोक तेथे पोहोचले आणि त्यांनी अतीक आणि अशरफ यांना जवळून गोळ्या घातल्या. आतिकच्या डोक्यात गोळी लागली आणि गोळी लागताच दोन्ही भाऊ जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही भावांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे.