प्राजक्ता माळीनं घेतलं आलिशान घर, फोटो केला शेअर

WhatsApp Group

आपल्या रंगतदार अभिनयाने, अँकरिंग आणि नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केली. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती सोशल मीडियावर शेअर करत असते. प्राजक्ताने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. प्राजक्ताने पुण्यात तिचे स्वप्नातील घर विकत घेतले आहे. प्राजक्ताने घराचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात प्राजक्ता माळीच्या घराचा क्रमांक 1704 लिहिलेला आहे. त्याच्या स्वप्नातील घराचा मजला अतिशय सुंदर आहे.