Lucknow v Mumbai: मुंबई इंडियन्सचा संघ आता तरी जिंकणार का?

WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद पाच वेळा जिंकणारा मुंबई इंडियन्स Mumbai Indians संघ आयपीएल 2022 मध्ये सलग सात सामने गमावल्यानंतर गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी आहे. आज रोहित शर्माच्या संघाचा सामना आज लोकेश राहुलच्या लखनऊ सुपर जायंट्सशी Lucknow Super Giants होईल, जे 7 पैकी 4 सामने जिंकून गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत.

यंदाच्या मोसमात मुंबईसाठी काहीही चांगले झाले नाही. रोहित शर्माचा फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय आहे. जसप्रीत बुमराह आणि किरॉन पोलार्ड यांनाही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीत बुमराह एकटा पडताना दिसत आहे. गेल्या सामन्यात मुंबईला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात धोनीने शेवटच्या षटकात जयदेव उनाडकटचा धुव्वा उडवत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. हृतिक शौकिनला शेवटच्या सामन्यात संधी मिळाली होती आणि या सामन्यातही रोहित त्याला प्लेइंग-11 ठेवू शकतो.

लखनऊसाठी हा मोसम चांगला गेला आहे. संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली झाली आहे. मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाछी संघाला अजूनही चांगला पर्याय मिळालेला नाही. मनीष पांडे मुंबईविरुद्ध सामना वगळता इतर सामन्यांमध्ये चालता नाहीये. संघाने या तिसऱ्या स्थानी कृष्णप्पा गौतमचाही प्रयत्न केला, मात्र तो ही अयशस्वी ठरला.

मुंबई इंडियन्सचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, बेसिल थम्पी, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, मयंक मार्कंडेया, मुरुगन अश्विन , रिले मेरेडिथ, टायमल मिल्स, अर्शद खान, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, फॅबियन ऍलन, किरॉन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयाल आणि इशान किशन.

लखनऊ सुपर जायंट्सचा संघ – लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, दीपक हुडा, कृणाल पांड्या, एविन लुईस, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, काइल मायर्स, आवेश खान, दुष्मंता चमीरा, रवी बिश्नोई, आयुष बडोनी, मनन वोहरा, कृष्णप्पा गौतम, शाहबाज नदीम, अंकित राजपूत, मयंक यादव, मोहसीन खान आणि करण शर्मा.