RCB vs LSG: होम ग्राऊंडवरच बंगळुरूची घसरगुंडी; लखनऊचा रोमांचक विजय

0
WhatsApp Group

Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants: 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला. बंगळुरू चा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम खेळताना 181 धावा केल्या. दरम्यान, क्विंटन डी कॉकने 56 चेंडूत 81 धावांची खेळी केली, तर निकोलस पूरननेही 21 चेंडूत 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून लखनऊला मोठी धावसंख्या गाठण्यात मदत केली. दुसरीकडे, गोलंदाजीत मयंक यादवने यावेळीही आपल्या वेगवान खेळीने फलंदाजांना चकवा दिला. मयंकने 3 महत्त्वाचे बळी घेत लखनऊला 28 धावांनी विजय मिळवून दिला.

क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल यांनी लखनऊ साठी डावाची सुरुवात केली. राहुल पण ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर तो बाद झाला. त्याने 14 चेंडूत 2 षटकार मारत 20 धावा केल्या. दुसरीकडे, क्विंटन डी कॉकने 81 धावांच्या उत्कृष्ट खेळीत 8 चौकार आणि 5 दमदार षटकार ठोकले. देवदत्त पडिक्कल काही विशेष करू शकला नाही, पण मार्कस स्टॉइनिसने 15 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. निकोलस पूरनने 21 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांसह 40 धावांची शानदार खेळी खेळली आणि संघाला 181 धावांपर्यंत नेले.

विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांनी आरसीबीच्या डावाची सुरुवात केली. यावेळी कोहली 16 चेंडूत केवळ 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मयंक यादवचा स्पेल सुरू होताच बंगळुरू ची फलंदाजी पूर्णपणे ढासळलेली दिसून आली.एकेकाळी बंगळुरू ची धावसंख्या एकही विकेट न पडता 40 धावा होती, पण पुढच्या 18 धावांमध्ये संघाने 4 विकेट गमावल्या. डू प्लेसिसने 19 आणि रजत पाटीदारने 29 धावांचे योगदान दिले.

आरसीबीला शेवटच्या 5 षटकात 78 धावांची गरज होती.

15 षटकांनंतर बंगळुरू ची धावसंख्या 6 विकेटवर 104 धावा होती. महिपाल लोमरर प्रभावशाली खेळाडू म्हणून क्रीजवर आला होता. बंगळुरूला शेवटच्या 5 षटकात 78 धावा हव्या होत्या, पण यश ठाकूरने 16 व्या षटकात 19 धावा दिल्या, त्यामुळे बंगळुरू अजूनही सामन्यात आहे असे वाटत होते. नवीन उल-हकने 17व्या षटकात 13 धावा दिल्या, पण दिनेश कार्तिकची विकेटही घेतली. लॉमररच्या 13 चेंडूत 33 धावांची दमदार खेळी केली, पण यश ठाकूरच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.

बंगळुरू ला शेवटच्या 2 षटकात 44 धावा हव्या होत्या आणि फक्त 1 विकेट हातात होती. मोहम्मद सिराजने रवी बिश्नोईच्या चेंडूवर सलग 2 षटकार ठोकले, परंतु हे सर्व अपुरे ठरले. शेवटच्या 6 चेंडूंवर संघाला विजयासाठी 30 धावांची गरज होती, परंतु मोहम्मद सिराज 20 षटके पूर्ण होण्याआधीच बाद झाला. बंगळुरू 153 धावांवर ऑलआऊट होताच एलएसजीने 28 धावांनी सामना जिंकला.

दोन्ही संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (यष्टीरक्षक), मयंक डागर, रीस टोपली, मोहम्मद सिराज, यश दयाल.

लखनऊ सुपर जायंट्स : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव .