IPL २०२२: लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी केला पराभव

WhatsApp Group

पाच वेळा IPL चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सला IPL २०२२ मध्ये सलग सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे Mumbai Indians SIX successive loss. शनिवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी पराभव केला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सने सलग ६ सामने गमावले आहेत. आता मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचणे खूप कठीण झाले आहे.

या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल याने तुफान फटकेबाजी करत दमदार शतक ठोकले. लोकेश राहुलच्या दमदार खेळीवर लखनौने २० षटकांत १९९ धावा केल्या होत्या. मात्र लखनौने दिलेले आव्हान मुंबईला पार करता आले नाही. लखनौने हा सामना १८ धावांनी जिंकला आहे.

लखनौ संघाने फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली होती. कर्णधार केएल राहुलने ६० चेंडू खेळून १०३ धावा केल्या. डी कॉकने चांगली फटकेबाजी केली मात्र तो २४ धावांवर बाद झाला तर मनीष पांडेने ३८ धावा केल्या. या सर्वांच्या दमदार खेळीने लखनौने निर्धारीत २० षटकांत १९९ धावा केल्या.

कर्णधार केएल राहुलने वादळी शतक – लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने या सामन्यात धडाकेबाज खेळी खेळली आणि शतक पूर्ण केले. राहुलने ५६ चेंडूत शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे केएल राहुलचा हा १०० वा आयपीएल सामना होता. आयपीएल २०२२ मध्ये त्याचे हे दुसरे शतक आहे, राहुलच्या आधी जोस बटलरने या मोसमात शतक केले आहे. जोस बटलरनेही मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावले होते.

या सामन्यात धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली, कर्णधार रोहित शर्माने आपला खराब फॉर्म कायम ठेवला.  तो अवघ्या ६ धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर डेव्हाल्ड ब्रेव्हिसने ३१ धावांची खेळी खेळली, त्यावेळी मुंबईची जिंकण्याची आशा वाढली, पण तोही बाद झाला. इशान किशन, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनीही चांगली सुरुवात केली मात्र नंतर त्यांनीही आपली विकेट्स गमावली.

मुंबई इंडियन्सला शेवटच्या ५ षटकात ७५ धावांची गरज होती, त्यानंतर पोलार्डने आघाडी घेतली. पोलार्डने एका बाजूने सतत चौकारांचा पाऊस पाडला. जयदेव उनाडकटनेही किरन पोलार्डला साथ दिली. डावाच्या 19व्या षटकात जयदेव उनाडकटने एक षटकार आणि दोन चौकार मारला, ज्यामुळे सामन्याचे चित्र फिरेल असं वाटत होतं. जेसन होल्डरच्या या षटकात मुंबई इंडियन्सने एकूण १७ धावा केल्या. मुंबईला शेवटच्या षटकात विजयासाठी 26 धावांची गरज होती. पण पहिल्या चेंडूवरच विकेट पडली आणि लखनौ सुपर जायंट्सने हा सामना १८ धावांनी जिंकला.