लखनऊ ‘या’ नावाने आयपीएलच्या मैदानात उतरणार!

WhatsApp Group

नवी दिल्ली- इंडियन प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या लखनऊ संघाने आपल्या नावाची घोषणा केली आहे. संजीव गोएंका ग्रुपच्या या संघाचे नाव लखनऊ सुपरजायंट्स असेल. लखनऊ संघाने आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर करत याची घोषणा केली आहे.


लखनऊ सुपरजायंट्सने आयपीएल लिलावापूर्वी केएल राहुल, मार्कस स्टॉइनिस आणि रवी बिश्नोई यांना करारबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. केएल राहुलची संघाचा कर्णधार म्हणून निवड केली असून फ्रँचायझीने त्याला 17 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू  खेळाड मार्कस स्टॉइनिसची नंबर-2 खेळाडू म्हणून निवड करण्यात आली असून त्याला 11 कोटी रुपये मिळणार आहेत. दुसरीकडे, रवी बिश्नोईला 4 कोटी रुपये देऊन करारबद्ध केले आहे.