LSG vs DC: इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या 26 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. लखनौ संघाने दिल्ली कॅपिटल्ससमोर 168 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्याच्या प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सस संघाने हे लक्ष्य सहज गाठले. दिल्ली कॅपिटल्स संघाचा हा या मोसमातील दुसरा विजय ठरला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर केएल राहुलने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जिथे लखनौच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 167 धावा केल्या. पॉवर प्लेमध्ये लखनौने 2 गडी गमावले, पण शेवटी आयुष बडोनीच्या झंझावाती खेळीमुळे संघाने सन्मानजनक धावसंख्या फलकावर लावली.
लखनौच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर क्विंटन डी कॉक 19 धावा करून बाद झाला. केएल राहुल 39, देवदत्त पडिक्कल 3, मार्कस स्टोइनिस 8, दीपक हुडा 10, कृणाल पंड्या 3 धावा करून बाद झाले. त्याचवेळी निकोलस पूरनने पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता विकेट गमावली.
मात्र, अखेरीस आयुष बडोनी आणि अर्शद खान यांच्यात 8व्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी झाली. बडोनी 35 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 55 धावांवर परतला, तर अर्शद 16 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 20 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे लखनौने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 167 धावा केल्या होत्या.