
ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि दिवाळी यांसारखे मोठे सण येत आहेत. अशा वेळी खर्च आधीच वाढलेला असताना, गॅस एजन्सीने आज (१ ऑक्टोबर २०२५) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ फक्त १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. हे सिलिंडर मुख्यतः हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि केटरिंग व्यवसाय याठिकाणी वापरले जातात. त्यामुळे आता हॉटेल आणि खाद्यपदार्थ व्यवसायावर खर्चाचा अधिक ताण येणार आहे.
शहरानुसार १९ किलोच्या सिलिंडरची जुनी आणि नवी किंमत (रुपयांत):
शहर जुनी किंमत नवी किंमत वाढ
दिल्ली – 1595.5
कोलकाता- 1700.5
मुंबई- 1547
चेन्नई – 1754.5या वाढीमुळे ग्राहकांना बाहेर खाण्याच्या पदार्थांचे दर वाढण्याची शक्यता आहे. कारण हॉटेल व रेस्टॉरंट्सना अतिरिक्त खर्चाची भरपाई करावी लागणार आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महागाईत झालेली ही दरवाढ सामान्य माणसासाठी आणि व्यापाऱ्यांसाठी चिंताजनक ठरत आहे.