LPG Cylinder Price: महागाईचा बॉम्ब पुन्हा फुटला, गॅस सिलिंडर झाला महाग
देशात आजपासून एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती लागू झाल्या असून त्यांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने आजपासून लागू होणार्या नवीन दरांची माहिती दिली आहे.
LPG Cylinder Price: 3 डिसेंबरला पाच राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वी महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आला आहे. 1 डिसेंबरपासून एलपीजी गॅस सिलिंडर महाग झाला आहे. आजपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी नोव्हेंबरनंतर पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. राजधानी दिल्लीत गॅस सिलिंडरच्या दरात 21 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे येथील सिलिंडरचा दर 1796.50 रुपयांवर पोहोचला आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत 19 किलोचा सिलेंडर 1775 रुपयांना मिळत होता. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे विशेषतः रेस्टॉरंट किंवा खाद्यपदार्थ व्यवसायावर परिणाम होईल. याचा परिणाम बाहेर खाणाऱ्या लोकांच्या खिशावर होऊ शकतो.
व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर 1 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. 19 किलोच्या सिलिंडरसाठी तुम्हाला आजपासून दिल्लीत 1796.50 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे, कोलकातामध्ये तुम्हाला 1885.50 रुपयांऐवजी 1908 रुपये मोजावे लागतील, मुंबईमध्ये तुम्हाला 1728 रुपयांऐवजी 1749 रुपये मोजावे लागतील. चेन्नईमध्ये ही किंमत 1968.50 रुपये झाली आहे. तर यापूर्वी येथे 1942 रुपयांना सिलिंडर मिळत होता. तेल कंपन्यांकडून दर महिन्याच्या 1 तारखेला नवीन सिलिंडरचे दर जारी केले जातात.
राजस्थानमधील जयपूरमध्ये सिलिंडर 1819 रुपयांनी महागला आहे. त्याचप्रमाणे मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये आजपासून 1804.5 रुपये मोजावे लागणार आहेत. हैदराबाद, तेलंगणामध्ये 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 2024.5 रुपये झाली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये यासाठी तुम्हाला 2004 रुपये मोजावे लागतील. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतच वाढ झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबत सरकारने नुकताच बदल केला आहे.
1 डिसेंबरपासून दर लागू
दिल्ली-1796.50
कोलकाता-1908
मुंबई-1749
चेन्नई-1968.50
गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडर 100 रुपयांनी महागला
गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजे 1 नोव्हेंबरलाही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांहून अधिक वाढ करण्यात आली होती. एलपीजीच्या या किमती 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरवर वाढवण्यात आल्या आहेत. देशात 1 नोव्हेंबर रोजी करवा चौथचा सण साजरा करण्यात आला आणि या सणासुदीच्या दिवशी महागाईने हैराण झाले होते. 1 ऑक्टोबर रोजी एलपीजी 1731.50 रुपये होता, तर 1 नोव्हेंबरला त्याचा दर 101.50 रुपयांनी महागला आणि तो 1833 रुपये प्रति सिलेंडर झाला. यानंतर, 16 नोव्हेंबर रोजी, व्यावसायिक गॅसची किंमत कमी करण्यात आली आणि तो 57.05 रुपयांनी स्वस्त झाला आणि 1775.50 रुपयांवर आला.
व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग झाल्याने काय परिणाम होणार?
व्यावसायिक गॅसच्या वाढत्या किमतीचा परिणाम खाद्य उद्योग आणि रेस्टॉरंट व्यवसायावर अधिक दिसून येईल. सर्वसामान्यांसाठी बाहेर खाणे महाग होणार आहे.
कंपन्यांनी 14.2 किलो LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. याआधी सरकारने या सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी केली होती. इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हा सिलिंडर दिल्लीत 903 रुपयांना उपलब्ध आहे. हा सिलिंडर नोएडामध्ये 900.50 रुपयांना उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये प्रति सिलिंडर 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये आहे.